२ उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी एस एल वी सी- ५३ या मोहिमे अंतर्गत देशातल्या स्टार्टअप मध्ये उभारणी झालेल्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अवकाश कंपन्या आणि इसरो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था यांचं या यशाबद्दल प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आणखी भारतीय कंपन्या अवकाशात झेप घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.