राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी माजी कुलगुरु डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्ण पदके तसेच इतर पारितोषिके प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.