प्रधानमंत्री पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दूरस्थ पद्धतीनं ही परिषद होणार असून, यात इस्रायलचे प्रधानमंत्री याइर लापिड, अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन सहभागी होणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील संयुक्त प्रकल्प तसंच व्यापार आणि गुंतवणुकीतील आर्थिक भागीदारी बळकट करण्याबाबत चर्चा होईल.