मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली आणीबाणी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं  या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले. मंकीपॉक्सच्या  उद्रेकाचा आढावा घेण्यासाठी या संघटनेनं आयोजित केलेल्या आपत्कालीन समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर ही आणीबाणीची घोषणा केली. डब्ल्यू एच ओचे महासंचालक टेड्रोस एडानॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या संक्रमणामुळं जगभरातल्या ७५ देशांमधले १६ हजारांहून अधिक लोक बाधित झाले असून त्यापैकी ५ जण मृत पावले आहेत.