सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू  झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केलं. याचवेळी  केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते रक्षा, या मोबाईल अॅपचंही उद्घाटन झालं. आयुर्वेदाच्या मदतीनं बालकांच्या आरोग्याबाबत पालकांमधे सजगता निर्माण करण्याचं काम अॅपच्या माध्यमातून केलं जाणार आहे. यावेळी सोनोवाल यांनी अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनांही मार्गदर्शन केलं.