राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल  jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जून मध्ये झालेली जेईई मेन सत्र १ या परीक्षेला सात लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.