लातूर इथ मेंदू मृत झालेल्या महिलेच्या अवयव दानामुळे तीन रुग्णांना जीवनदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या एका ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेल्या महिलेचे अवयव दान करण्यात आल्यानं, तीन रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला घरी चक्कर येऊन पडल्यानं, त्यांच्या डोक्यावर आघात होऊन मेंदू मृत झाल्याचं लक्षात आल्यावर, त्यांची दोन्ही मूत्रपिंड, यकृताचं पुण्यातल्या तीन रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आलं. त्यासोबतच कॉर्निया अर्थात नेत्रपटलही दान करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.