ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायलयानं फेरविचार करावा, अशी याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे.याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,तसंच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करु, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. केंद्राकडे मागणी न करता पूरग्रस्तांना मदत केली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं.