महागाईच्या प्रश्नावरुन सभागृहात गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे १८ सदस्य निलंबित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या १८ सदस्यांना उपाध्यक्षांनी आज निलंबित केलं. आठवडाभरासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज पावणे ४ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

संसदेचं कामकाज सुरू झाल्यावर सकाळी दोन्ही सभागृहात कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर गुजरातमधल्या विषारी दारूमुळं नागरिकांचा झालेला मृत्यू, महागाई आणि इतर मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शनं केली. त्यामुळं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.