बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये जाती आधारित जनगणना करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. ही जाती आधारित जनगणना निर्धारित वेळेत पूर्ण होईल तसंच याबाबतचा मंत्रिमंडळाचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. या जनगणनेचा खर्च बिहार सरकार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.