विशेष सीबीआय न्यायालयाकडून सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विशेष सीबीआय न्यायालयानं आज मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही परवानगी मिळाली आहे.

विशेष न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांनी याचिका स्वीकारताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत दिलेली सर्व वस्तुस्थिती न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उघड करावी, खटल्यादरम्यान संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सरकारी वकिलानं विचारलेल्या प्रश्नांची त्याने सत्यपणे उत्तरे द्यावीत, असं नमूद करण्यात केलं आहे.