मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गृह विभागाच्या दि.१६ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालय प्रवेश पास प्रक्रिया बंद करण्यात आली होती. या विभागाच्या दि. ३० ऑगस्ट २०२१ च्या परिपत्रकान्वये सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय गार्डन गेट प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.
अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येणारी Visitor Pass Management System (VPMS) दि. १८ मे, २०२२ पासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. प्रवेशपास ठिकाणी टपाल स्वीकृतीकरिता केलेली व्यवस्था बंद करण्यात आली असून टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्वीकारले जाणार आहे. यानुसार सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी तसेच मंत्रालयीन नियंत्रणाखालील सर्व विभाग व कार्यालयांनी टपाल शक्यतो ईमेलद्वारे पाठवावे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. 18 मे 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.