देशात आतापर्यंत १९४ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९४ कोटी २३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८९ कोटी ३८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर ३ कोटी ५६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ६० लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ५ कोटी २५ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून ७ लाखापेक्षा नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे ५५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ७२ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ३७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर २९ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६६ लाख ९४ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३२ लाख ६९ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.