केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. नाशिकमधलं सद्गुरु मोरेदादा धर्मादाय रुग्णालय हे १ हजार खाटांचे मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालय आहे, जे २१ एकरात पसरलेले आहे आणि जिथं निसर्गोपचाराद्वारे उपचार केले जातात.

यावेळी बोलतांना शहा म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हजारो लोकांना स्वस्त दरात उपचार देणार आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. हे देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतलेल्या हजारो लोकांना प्रेरणा देईल, असं ही त्यांनी सांगितलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image