कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर देशांतर्गत पुरवठ्यात ४३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. २०१३-१४ मध्ये कोल इंडियानं आतापर्यंत सगळ्यात स्वस्त आणि पुरेसा कोळश्याचा पुरवठा केला आहे. सतत वाढणारी कोळशाची मागणीही वेळेत पूर्ण केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोळशाच्या किमती गगनाला भिडल्या असतानाही कोल इंडियानं परवडणाऱ्या दरात कोळशाचा पुरवठा केला आहे.