ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष पद्धतीनं सुरू असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मागासवर्ग आयोगाकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं सुरू असलेलं काम सदोष आहे. यात आडनावावरुन लोकांची जात ठरवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळं प्रत्यक्ष संख्येपेक्षा कमी नागरिक ओबीसी असल्याचं समोर येत आहे. राज्य सरकारनं याप्रकाराची योग्य दखल घेतली नाही तर आंदोलन करु असं ते म्हणाले. 

बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव यांना माहिती दिली आहे. आयोगाच्या अध्यक्षांशीही चर्चा केली असल्याचं ते म्हणाले. डेटा गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करुन ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ असं ते म्हणाले. याप्रकरणी १२ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.