उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये राऊत यांमुळे दरी निर्माण - दीपक केसरकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर दीपक केसरकर यांनी आज एक खुलं पत्र लिहून महाविकास आघाडीऐवजी भाजपासोबत युती करण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये दरी निर्माण केल्याचं काम राऊत यांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच हे बंड नसून शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना हिंदूत्वापासून दूर नेणार असाल तर ते कसं खपवून घ्यायचं, असा सवाल त्यांनी या पत्रात केलाय. संजय राऊतांच्या सल्ल्यानं पक्ष चालणार असेल. त्यांचे ऐकून आमच्या सारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जाणार असेल तर आम्ही काय करायचं असा सवाल त्यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे.