द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाजवादी पार्टीचा पाठिंबा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात जाण्याचा आपला हेतू नाही तथापि आदिवासी महिलेला देशाचं सर्वोच्च पद मिळावं या भूमिकेतून हा निर्णय घेत आहोत. बसपाचा उत्तर प्रदेशात एक आमदार असून संसदेत १० खासदार आहेत.