वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार - वर्षा गायकवाड

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. शाळांना यासंदर्भात नवीन दिशानिर्देश जारी करण्यात येतील, असंही त्या म्हणाल्या. शाळांना मास्क वापरणं बंधनकारक नसणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.