देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली आहे - अण्णा हजारे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली असल्याची माहिती, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. ते आज राळेगणसिद्धी इथं पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय लोक आंदोलन या संघटनेची घोषणा आपल्या जन्मदिनी, एकोणीस जूनला दिल्लीमध्ये करणार असल्याचं, तसंच कार्यकर्त्यांना एक दिवसाचं प्रशिक्षण देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारनं ऑगस्टपर्यंत लोकायुक्त कायदा आणला नाही तर पूर्ण राज्यभर यासाठी आंदोलन छेडू, असा इशारा हजारे यांनी दिला. हे आंदोलन सुरू करण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या दोनशे तालुक्यांमध्ये समितींची स्थापना केल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी देशभरात राष्ट्रीय लोक आंदोलन करणार असल्याचंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.