मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

 

मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात,” महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची शर्थ केली. प्रखर राष्ट्रभक्ती, स्वाभिमान यांचा आदर्श घालून दिला. त्यांचे जीवन म्हणजे शौर्य आणि धैर्याची अजरामर गाथा आहे. महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.”

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image