भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ लष्करी सराव बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ हा संयुक्त लष्करी सराव काल बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु झाला. ५ ते १६ जून दरम्यान होणाऱ्या या सरावाची ही १० वी आवृत्ती आहे. दहशतवाद आणि घुसखोरीचा सामना, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्य एकत्रितपणे करणं हे या संयुक्त सरावाचं उद्दिष्ट आहे. बांगलादेशचे जेसोर विभागाचे प्रमुख मेजर जनरल मोहोम्मद नुरुल अन्वर यांनी या सरावाचं उदघाटन केलं. या संयुक्त लष्करी सरावामध्ये भारतीय लष्कराचं नेतृत्त्व ब्रिगेडिर जनरल रुपेश शेहगल करणार आहेत. भारत आणि बांग्लादेश २०१० सालापासून संयुक्त लष्करी सराव आयोजित करत असून दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image