आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये लातूर - पंढरपूर रेल्वे गाडीचा समावेश आहे. ही गाडी 5,6,8,11,12 आणि 13 जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी याच दिवशी पंढरपूर इथून दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी सुटेल आणि लातूरला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.