कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून १४ ते २६ जून या कालावधीत राजर्षी शाहूमहाराजांवर व्याख्यान, मान्यवरांचा सत्कार , जलतरण स्पर्धा, स्केटिंग मशाल मिरवणूक, थुंकीमुक्त कोल्हापूर साठी प्रतिज्ञा, कपडे आणि धान्यवाटप, अशा  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकोत्सवात कोल्हापूरकरांनी कर्तव्य भावनेने सहभागी होण्याचे आवाहन जयंती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केल आहे .