केंद्राकडून वस्तु आणि सेवा कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना अदा केली.

विविध राज्यांसाठी केंद्रानं एकंदर ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई रक्कम काल वितरीत केली. यामध्ये महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. तर गोव्याला १ हजार २९१ कोटी रुपये भरपाईपोटी मिळाले आहेत.