startupindia.gov.in या भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांनी आज मुंबईत भारत- संयुक्त अरब अमिरात आर्थिक भागीदारी परिषदेत संयुक्तरित्या ‘स्टार्ट अप इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन’ या  भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ केला. या सेतूमुळे दोन्ही देशातील उद्योजक आणि संबंधितांना भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील स्टार्ट अप परिसंस्थेची माहिती सुलभपणे उपलब्ध होईल. युएईकडून अन्य कुठल्या देशासोबतचा अशा प्रकारचा हा पहिलाच सेतू असल्याचं संयुक्त अरब अमिरातीचे लघु आणि मध्यम तसंच उद्योजकता राज्यमंत्री डॉ. अहमद अल फलासी यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशातील स्टार्ट अपमधील गुंतवणूक वाढण्यासाठी, स्टार्ट आपच्या विस्तारासाठी आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी हा सेतू उपयुक्त ठरेल, असं पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं. क्षमताबांधणीच्या दृष्टीनेही सेतू उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले.