अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाच्या १३ व्या वार्षिक कार्यक्रमात पूर्व प्रादेशिक कार्यालयाचं दूरदृश्यप्रणालीद्वारे  उद्घाटन केलं. विविध कारणांमुळे वस्तूंच्या वाढत्या किंमतींचा उल्लेख करताना कमी पुरवठा परिस्थितीचा शोध घेण्याची गरज आहे. तसचं नियामकाना विलीनीकरण आणि अधिग्रहणांबद्दल सक्रिय समज असणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.सीतारामन यांच्याकडे कॉर्पोरेट मंत्रालयाचं प्रभारीपद असून सीसीआयनं संवेदनशील आणि दृढ असणं आवश्यक असल्याचं त्या बोलल्या.