नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसूफ उपस्थित राहतील. ओमानचे ४८ सदस्यांचं  शिष्टमंडळ आजपासून भारतभेटीवर आलं आहे. या मंडळात ओमानच्या आरोग्य, पर्यटन, खाणकाम, दूरसंचार , ऊर्जा, नौवहन , इत्यादी महत्वाच्या क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश आहे.या भेटीमुळे भारत आणि ओमानमधले आर्थिक सम्बन्ध अधिक मजबूत होण्यासाठी महत्वाच्या संधी मिळतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.