भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झाल्यामुळे देशाच्या विविध भागांमधला दर्जेदार आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचणार आहे. बारामती इथल्या एका निर्यातदारानं हापूस, केशर आणि गोवा मानकूर या प्रकारचे आंबे भेट म्हणून पाठवल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. आंबा निर्यात पुन्हा सुरू झाली त्याबद्दल अमेरिकेतल्या भारतीय दुतावासानं आंबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्यात अमेरिकन प्रशासन, अमेरिकन काँग्रेस, विविध क्षेत्रातले तज्ञ, कला, उद्योग, शिक्षण या क्षेत्रातल्या व्यक्ती, विद्यार्थी सहभागी झाले होते अशी माहिती अमेरिकेतले राजदूत तरणजित सिंग संधू यांनी दिली आहे.