ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं सांगतभाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकारिणीची ही बैठक आज मुंबईत झाली.

ओबीसी मोर्चा  कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या हेतूवरच यावेळी शंका व्यक्त केली. ओबीसींना आरक्षण मिळू नये, असं राज्य सरकारला वाटत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी आता गावागावात जाऊन आंदोलन करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.   सरकारबरोबर संघर्ष करत असताना समाजाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन पाटील यांनी केलं.