प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडू नये- उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं असून कायदा हातात घेण्याचं धाडस कोणी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

राज्यातल्या प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, मात्र आवाजाची मर्यादा ओलांडू नये, असं ते यावेळी म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे जनतेचं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, ओबीसींना आरक्षण मिळावं अशी सरकारची भूमिका असून, याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.  

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image