वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यात नरोत्तम नगरच्या रामकृष्ण मिशन शाळेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्य भारताला अनेक समस्या भेडसावत आहेत मात्र २0१४ पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या समस्या एक एक करून सोडवल्या जात असल्याचं ते म्हणाले.
या भागाचा विकास रचनात्मक पद्धतीने होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी त्रिस्तरीय योजना राबवत असल्याचं ते म्हणाले. यातल्या पहिल्या भागात केवळ या क्षेत्राच्या संस्कृतीचे जतन करण्यात येणार नसून देशभर सर्वत्र हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे ते म्हणाले. दुसऱ्या भागात ईशान्य भारताच्या सर्व समस्या सोडवणार असून इथल्या युवाशक्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले.
तिसऱ्या भागात ईशान्य भारतातल्या आठ राज्यांना देशातली सर्वात जास्त विकसित राज्य बनवण्याचा प्रयत्न असल्याचा शहा यांनी यावेळी सांगितलं. आसाम आणि मेघालय मधल्या सीमा रेषेचा प्रश्न सोडवण्यात ६0 टक्क्यांपर्यंत यश आल्याचं ते यावेळी म्हणाले. आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या सीमारेषेचा तिढा 2023 पर्यंत सोडवला जाईल असं शहा यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.