गव्हाची निकड असलेल्या मित्रदेशांना यापुढेही निर्यात केली जाईल - पीयूष गोयल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताशी पूर्वापार मैत्रीसंबंध असलेल्या देशांमधे गव्हाची निकड असल्यास त्यांना गहू निर्यात करण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत ते बोलत होते. गव्हाचं उत्पादन यंदा ७ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे मात्र वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणामही होऊ शकतो. प्राप्त परिस्थितीत देशांतर्गत गरज भागवण्याइतकं गव्हाचं उत्पादन होत आहे. भारतानं गहू निर्यात करायला दोन वर्षांपासूनच सुरुवात केली असून गेल्या वर्षभरात सात लाख मेट्रीक टन गहू निर्यात केला. यातला बहुतांश गहू रशिया युक्रेन युद्धाच्या काळात निर्यात झाला आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image