दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ

 


मुंबई : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनतर मंत्रालयामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने शपथ घेतली.

            मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवसामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेउद्योग संचालनालयाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. 21 मे या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी असते. हाच दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळला जातो.