अमेरिकेतल्या टेक्सासच्या दक्षिणेकडील शहरात गोळीबार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या टेक्सासच्या दक्षिणेकडील शहरात एका अठरा वर्षाच्या माथेफिरुनं केलेल्या गोळीबारात १९ शालेय विद्यार्थी आणि २ शिक्षकांच मृत्यू झाला. टेक्सासच्या उवाल्ड इथल्या प्राथमिक शाळेत ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मरण पावलेले शालेय विद्यार्थी हे सात ते दहा वर्षे वयोगटातले असून इयत्ता दुसरी ते चौथीमध्ये शिकत होते, असं टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी सांगितलं. ज

वळपास एक दशकापूर्वी कनेक्टिकटच्या न्यूटाऊन इथल्या सँडीहूक एलिमेंटरी इथंही अशी प्राणघातक गोळीबाराची घटना घडली होती. याआधी दहाच दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये बफेलो इथं एका दुकानात १० जणांना एका बंदूकधाऱ्यानं गोळ्या घालून ठार केलं होतं. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी २८ मेपर्यंत दररोज सूर्यास्त होईपर्यंत राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्याचे आदेश दिले असून बंदुकांवर निर्बंध आणण्यासाठी भावनिक आवाहन करत कारवाई करण्याचा इशाराही दिला.