राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस उपस्थित होते. आमचे तिन्ही उमेदवार सक्रिय असून तिघेही निवडून येतील, असा विश्वास फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केला. देशातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनता समाधानी असल्याचं ते म्हणाले. मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असून महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी मिळाल्याचा आनंद पियुष गोयल यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार जनतेप्रती समर्पित असून यापुढेही समर्पित राहील, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं.