हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड लशीच्या दरात कपात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड या लस उत्पादक कंपनीने कोर्बेवॉक्स या कोविडविरोधी लशीच्या दरात कपात केली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांना वस्तू आणि सेवाकरासहित ही लस 840 ऐवजी अडीचशे रुपयांत मिळू शकेल. रुग्णालयाचं दीडशे रुपये शुल्क गृहित धरल्यावर लाभार्थ्यांना प्रतिमात्रा चारशे रुपये दराने या लशीची मात्रा मिळू शकेल असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 12 ते 17 वर्ष वयोगटाकरता ही लस असून तिच्या आतापर्यंत 4 कोटी एकोणचाळीस लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लस उत्पादक कंपनीने सुमारे 10 कोटी मात्रा केंद्रसरकारला पुरवल्या आहेत. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image