अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे - अमित शहा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता असल्याच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत झालेल्या अमरनाथ यात्रा उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते.

यात्रेकरूना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले असून संपर्क यंत्रणा वाढण्यासाठी मोबाईल टॉवर वाढवणे, दरडी कोसळल्यास मार्ग त्वरित रिकामा करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री तैनात ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. सर्व यात्रेकरूंचा पाच लाखांचा विमा उतरवण्यात आला असून त्यांना पहिल्यांदाच रेडियो फ्रिक्‍वेंसी आई‍डेंटिफिकेशन देण्यात येणार आहे.