निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अंगडीया खंडणी प्रकरणी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्यानं हे पाऊल उचलल्याचं पोलीसांनी सांगितलं. रोकड आणि मौल्यवान वस्तूंची ने-आण करणाऱ्या अंगडीया व्यावसायिकांकडून दरमहा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची  तक्रार  त्रिपाठीविरुद्ध आहे.