लहान आणि मध्यम उद्योगांना बाजारपेठेशी संपर्क पुरवणाऱ्या भारतीय व्यापार पोर्टलचा प्रारंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान आणि मध्यम उद्योगांना बाजारपेठेशी संपर्क पुरवणाऱ्या भारतीय व्यापार पोर्टलचं उद्घाटन उद्योग आणि वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं. लघु उद्योजक, निर्यातक, कारागीर आणि शेतकऱ्यांना या पोर्टलमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं दालन खुलं होणार आहे.  इ-कॉमर्समुळे अनेक उद्योगांना फायदा झाला असून विशेषतः कोविड काळात अनेक उद्योग या माध्यमाच्या आधाराने तगून राहू शकले असं पटेल यावेळी म्हणाल्या. उद्योगांप्रति प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आणि सरकारचं धोरण याचा भाग म्हणून अशा सुविधा उपलब्ध होत आहेत असं त्यांनी सांगितलं.