राज्यात काल कोविड१९ च्या १२१ नव्या रुग्णांची नोंद

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड१९ च्या १२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७९ हजार ३९९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७७ लाख ३० हजार २०९ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४७ हजार ८४७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल ६३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ६१ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. २ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. आज ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत सध्या ८२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला कोरोना मुक्तीचा दर ९८ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६ हजार ३४७ दिवसांवर आला आहे.