तुळशीबागेतली दुकानं बंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

इथं असलेल्या २२१ व्यावसायिकांपैकी फक्त ४ व्यावसायिकांनी भाडं भरलेलं आहे. इतरांनी २०१८ पासून थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे अतिक्रमण विभागानं तुळशीबाग बंद केली आहे.