भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कॉटन मॅन अर्थात कापूस उत्पादनातले अनुभवी सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या कापूस मूल्य साखळीतील  हितधारकांच्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या परिषदेत वस्त्रोद्योग, कृषी, वाणिज्य आणि अर्थ मंत्रालयांचे  तसंच कापूस महामंडळ आणि कापूस संशोधन परिषदेचे प्रतिनिधी असतील. या प्रस्तावित परिषदेची  पहिली बैठक येत्या २८ तारखेला आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात भरीव सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने कृती योजना तयार करण्यासाठी हि परिषद काम करेल.

कापूस उत्पादक शेतकरी आणि वस्त्रोद्योगातल्या  विणकरांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध असून या परिषदेने त्यासाठी उपाय सुचवण्याची अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.