परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली मुंबई या कार्यालयात दि.१ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावाअसे आवाहन, प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी केले आहे.

या योजनेकरिता महाविद्यालयविद्यापीठ प्रवेशअभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या माहिती पत्रकामध्ये तसेच इतर महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या पदवी  व पदव्युत्तर असणाऱ्या इच्छुक अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींनी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती देणे या योजनेकरिता विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयबोरीवली, मुंबई या कार्यालयास दि.१ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावा,असे प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image