शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्य शासनाकडुन मानवी हक्काचं उल्लंघन - राजू शेट्टी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्यशासन मानवी हक्काचं उल्लंघन करत आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. रात्री अपरात्री शेतात पाणी देताना हिंस्त्र प्राणी आणि सर्प दंशाने अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

नैसर्गिक साधन संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असताना शेतकर्‍यांच्या बाबतीत मात्र दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आता थेट न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.