सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत - राजीव कुमार

 



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जगात  रशिया - युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिर वातावरणातही  भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.