वागशीर या सहाव्या स्कॉर्पीन श्रेणीतल्या पाणबुडीचं मुंबईत जलावतरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत नौदलाच्या मुंबईतल्या माजगाव डॉक लिमिटेडनं आपली गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रोजेक्ट-७५ अंतर्गत माजगाव डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या वागशीर या सहाव्या स्कॉर्पीन श्रेणीतल्या पाणबुडीचं जलावतरण आज मुंबईत संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या उपस्थितीत झालं. वागशीर ही अत्याधुनिक लढाऊ पाणबुडी असून वागशीर या भारतात, समुद्रात खोल पाण्यात सापडणाऱ्या शिकारी माशाचं नाव या पाणबुडीला दिलं आहे. नौदलाच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी पुढले वर्षभर या पाणबुडीला विविध चाचण्यांना सामोरं जावं लागणार आहे. या पाणबुडीमुळे देशाच्या तटवर्ती भागातल्या सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ होणार आहे.