स्वच्छ भारत अभियान राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर

 


मुंबई (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. भविष्यातही राज्य असंच आघाडीवर रहावं यासाठी सकारात्मक कार्यवाही करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 'प्रशिक्षकांचं प्रशिक्षण' या उपक्रमाचा प्रारंभ काल, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या 'मित्रा' या प्रशिक्षण संस्थेत, दूरस्थ पद्धतीने करण्यात आला, त्यावेळी, प्रशिक्षकाशी संवाद साधताना पाटील बोलत होते.