कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधुचा दुसऱ्या फेरित प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधुनं अमेरिकेच्या लॉरेन लामला 21-15, 21-14 अशा सरळ गेममध्ये नमवत दुसऱ्या फेरित प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरित तीचा सामना जपानच्या अया ओहोरी बरोबर होणार आहे.

पुरुष एकेरित भारताच्या किदंबी श्रीकांतनं मलेशियाच्या डॅरन लीवला 22-20, 21-11 अशा सरळ गेममध्ये नमवत उपांत्यपूर्व फेरिच्या आधीची फेरी गाठली आहे. या फेरित त्याचा सामना इस्राईलच्या मिशा झिल्बरमन बरोबर होईल. पुरुष दुहेरित भारताच्या अर्जुन आणि ध्रुव या जोडीनं देखील दुसऱ्या फेरित प्रवेश केला आहे.