अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या साठी जम्मू आणि काश्मिर बँक, पीएनबी बँक, यस बँकेच्या 446 शाखांशिवाय भारतीय स्टेट बँकेच्या 100 शाखांमध्येही यात्रेकरू आपली नोंदणी करू शकतात. या शिवाय ऑनलाईन पद्धतीनंही नोंदणी करता येऊ शकेल. रामबाण इथल्या यात्री निवासात 3 हजार 600 यात्रेकरुंची राहण्याची सोय करण्यात आली आहे. या वेळी 3 लाख यात्रेकरू अमरनाथला भेट देतील, अशी अपेक्षा अमरनाथ तिर्थ बोर्डानं व्यक्त केली आहे. यात्रा 30 जूनला सुरू होऊन 11 ऑगस्टला संपेल.